माझ्याबद्दल

माझा फोटो
Village-Patane.Ta-Malegaon.Dist-Nashik, Maharashtra, India
Shri Ahire B. K. M.A. B.ED. Farmer; Retired Principal; Villager.

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था पाटने

महात्मा फुले जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था पाटने चे सभासद रंग पंचमी खेलत आहेत.

Posted by Picasa

सोमवार, १३ जून, २०११

एक वंदनिय व्यक्तिमत्व -श्री . भिला भाऊ


एक वंदनिय  व्यक्तिमत्व -श्री . भिला  भाऊ   वक्त्या -    सौ . जयश्री बी . आहिरे . 

 दि . ११ जानेवारी २०२३ - ८७ व्या वाढदिवसाच्या प्रसंगी. 

----------------------------------------------------------------------------------------

                                        सन्माननीय   व्यासपीठ आणि माझे ज्येष्ठ नागरिक  बंधू -भगिनी ०पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र  मंडळ   प्रथम तुम्हा सर्वाना माझा प्रणाम व  नव्या  वर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा .या नव्या वर्षात  तुमचे सारे मनोरथ पूर्ण होवोत . तुमच्या घरात सुख व समृद्धी नांदो.  सद्या  आपण आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातून वाटचाल करीत आहोत .अनेक अडीचणींना  तोंड देऊन मार्गक्रमण करीत आहोत हा मार्ग सुखकर व्हावा  म्हणून आपण सर्व एकत्र येऊन मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष  व उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने  कालक्रमणा करीत आहोत . आज ची मासिक सहल त्याचाच एक भाग असून त्यातच आपले उपाध्यक्ष श्री भिला भाऊ हे आज ८७ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे  औचित्य साधून हा दुग्धशर्करायोग  साधला आहे .   श्री भिला भाऊ  मंडळाचे  आधारस्तंभ आहेत . माझ्या  लग्नाला  जवळ जवळ ६० वर्ष होत आलीत .परंतु भिला भाऊ ही  व्यक्ती कोण आहे मला माहीत नव्हते . परंतु जेव्हा महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था स्थापन करण्यात  आली तेव्हा पासून  ते आपल्या संपर्कात आले . त्यांच्या धर्मपत्नीला जाऊन १५ वर्षे झालीत . त्यांनी आपल्या मुली व मुलाकडे पाहून दुसरा विवाह  केला तर नाहीच परंतु तसा विचार मनात ही  नाही

 आणला  ही  बाब मंडळाला भूषणावह  नाही का ? आदर्श  संसार चे उत्तम उदाहरण म्हणजे भिलाभाऊ .

      भाऊंना दोन मुले व चार मुली आहेत.एक मुलगा इंजिनिअर असून दुसरा पारंपरिक शेती  पाहत आहे . आता तर नातवंडे व पतवंडे यांनी घर गोकुळ  आहे.
              त्याचे हे गुण हेरून च त्यांना संस्थेचे अध्यक्ष करण्यात आले.त्यांनी त्याचे सोने ही केले. संस्था fescom सारख्या राज्यस्तरीय संस्थेशी संलग्न करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.  शिवाय श्री शंकरराव खैरनार  सारख्या संचालकास नगर-नाशिकच्या प्रादेशिक कार्यकरिणीवर निवडून आणले. आइस्कॉन राष्ट्रीय संस्थेवर ७ सभासद patron म्हणून पाठविले.
           पाटणे गावात लोकशाही रुजविण्यात   सुभाष मंडळ या संस्थेचा  सिंहाचा वाटा होता. भिला भाऊ मंडळाचे कार्यशील सभासद होते आणि सुभाष मंडळ बँड पथक मध्ये बासुरी वादक म्हणून १९६०--१९७० दशकात ख्याती पावले होते.तत्कालीन काळात चौदवी का चाँद हो ,या गाण्यावर  त्यांना अनेक once more
मिळाले .एक समतोल वृत्तीचा ,सर्वाना बरोबर घेऊन जाणारा सद्गृहस्थ .बोले तैसा चाले बिरुद मिरवणारा .किती सांगू? किती बोलू ? 
             गागर मे सागर नही भरा जाता ,हेच खरे !
म्हणून तुम्हा सर्वांचे आभार .भाऊंचे उर्वरित आयुष्य सुखावह अंत येईपर्यंत आनंदाचे जावो .
       Thank You .

शनिवार, २१ मे, २०११

श्रीराम मंदिर पाटने




Posted by Picasa पाटने - येथील हिन्दू देवालय पंच ट्रस्ट चे श्री राम मंदिर भग्न झाल्याने नव्याने बांधकाम सुरु झाले आहे । पाटने प्रेमी मंडलीने भरघोस मदत देणगी रुपाने करावी पाटन्याची अनेक मुले बाहेर गावी नोकरीला आहेत .गावासाठी काही करावे असे नाही का वाटत ? वाटते ना ; मग हात मोकलाकरा ना ?

विश्वस्त मंडल पाटने

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०१०

भूषण पाटन्याचे- श्री .रामचंद्र बापू.

असतील बहू होतील बहू परी या सम हाच ! तो म्हणजे आमचे रामचंद्र बापू .म्हटले तर आजही आमचे गाव पाटने तसे खेडेच . पण मालेगाव तालुक्यातील नाकात नथ शोभावी तसे .राजकीय ;धार्मिक ; आणि शैक्षनिंक क्षेत्रातही अग्रेसरच।आमची माळीयाची जात शेत लाऊ बागाईत। सावता माळी आणि महात्मा फुले यांचा वारसा सांगणारे .माळी बहुजातीय असले तरी अठरा पगड़ जातीचा वारसा असणारे । बारा बलुतेदार म्हणजे काय ते येथे पाहून जावे। अशाच एका छोटेखानी गाव पाटन्यात ज्या पाटन्याची ओळख दाभाडी पाटने अशी तर आहेच परंतू झाड़ू व बालू म्हणून ही ते ओलाखाले जाते पात्न्या