माझ्याबद्दल

Village-Patane.Ta-Malegaon.Dist-Nashik, Maharashtra, India
Shri Ahire B. K. M.A. B.ED. Farmer; Retired Principal; Villager.

बुधवार, १६ जुलै, २०२५

क्षेत्र पिनाकेश्वर मंदिर -जातेगांव नांदगाव.

आम्ही सर्व सभासद पाटने ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ. एक दिवशीय सहल दिनांक 27/06/2025 रोज शुक्रवार जाण्याचे नियोजन केले होते. त्या प्रमाणे खालील सभासद जमा झाले.
=============================
1.बाबुलाल  केदु आहिरे.
2 भिला सोनू खैरनार.
3.मोतीलाल रामकृष्ण बागुल.
4.नामदेव विष्णु बागुल.
5.शांताराम मोतीलाल कोतवाल.
6.राजकुमार जगन्नाथ बागुल.
7.दामू सुपडू आहिरे.
8.सुशिला दामू आहिरे. 
9.कांचन प्रणय आहिरे.
10.गौतमा जगन्नाथ खैरनार.

///////////////////?///?/////////??/////////////

              -------*****--------
 सर्व सभासद जमा झाल्या ची खात्री झाली. आणि आमची बस सुरु. झाली. सर्वानी हर हर महादेव चा जयघोष केला आमचा प्रवास सुखाचा होऊ दे!, अशी. प्रार्थना. . सयाजी राव गायकवाड़ यांचे जन्मगांव कौलाने मागे पडले.गाडी आता संभाजी नगर रोड ला लागलेली.   मेहुने  गाव मागे  गेले  आजु  बा जुला  पहान्या सारखे काहिच   नव्हते.
               नंतर मात्र सर्वत्र शांतता. घोरणे, डुलक्या, बरलने होते. नांदगाव पास झाल्या नंतर रस्ता ख़राब. सर्व  जागे झाले. एव्हाना कसारी गांव मागे पडले. घाट चढून गाडी वर विस्तीर्ण माळरान. खड़काळ,  निर्मनुष्य.
                      आता गाड़ी कसारा घाट चढून वर. दूरवर विस्तीर्ण वृक्ष हीन पठारी प्रदेश. शेती नाही, पशुपालन नाही. जणू निर्मनुष्य.
         आता आले गांव ढेकू. बऱ्या पैकी विकसित. दोन किलोमीटर वर  जातेगांव. 
   जातेगांव येथील राजकुमार यांचे मामाकड़े चहा घेऊन मंदिराकड़े निघालो.समोरील. डोंगर व त्यावरील. मंदिराच्या पताका दिसू लागला. रोड सीमेंट चा, नुकताच आमदार श्री कांदे साहेबांनी करुन घेतलेला असे समजले. अवघड़  वळनाचे चढ़, बाजूला खोल खोल दरी पाहून सर्वाचे संवाद बंद.
मंदिर आले! मंदिर आले.!! मंडळी खडबडून जागे झालेत. एव्हाना गाडी थांबताच उतरन्याची लगबग सुरु. आता परिसर अवलोकन. मंदिर दर्शन. आमच्या शिवाय अन्य चिटपाखरु नव्हते. मनपसंद, माथेटेकून दर्शन झाले. सर्व बाजूने सृष्टी सौंदर्य पाहुन समाधानी मनाने. आम्ही. बाहेर पडलो.
      परतिचा प्रवास विनासायास झाला. रस्त्यात एका मारुती मंदिर जेवने करुन घराकडे आमची एकदिवशीय सहल संपन्न झाली.



  




मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था पाटने

महात्मा फुले जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था पाटने चे सभासद रंग पंचमी खेलत आहेत.

Posted by Picasa

एक वंदनिय व्यक्तिमत्व -श्री . भिला भाऊ


एक वंदनिय  व्यक्तिमत्व -श्री . भिला  भाऊ   वक्त्या -    सौ . जयश्री बी . आहिरे . 

 दि . ११ जानेवारी २०२३ - ८७ व्या वाढदिवसाच्या प्रसंगी. 

----------------------------------------------------------------------------------------

                                        सन्माननीय   व्यासपीठ आणि माझे ज्येष्ठ नागरिक  बंधू -भगिनी ०पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र  मंडळ   प्रथम तुम्हा सर्वाना माझा प्रणाम व  नव्या  वर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा .या नव्या वर्षात  तुमचे सारे मनोरथ पूर्ण होवोत . तुमच्या घरात सुख व समृद्धी नांदो.  सद्या  आपण आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातून वाटचाल करीत आहोत .अनेक अडीचणींना  तोंड देऊन मार्गक्रमण करीत आहोत हा मार्ग सुखकर व्हावा  म्हणून आपण सर्व एकत्र येऊन मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष  व उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने  कालक्रमणा करीत आहोत . आज ची मासिक सहल त्याचाच एक भाग असून त्यातच आपले उपाध्यक्ष श्री भिला भाऊ हे आज ८७ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे  औचित्य साधून हा दुग्धशर्करायोग  साधला आहे .   श्री भिला भाऊ  मंडळाचे  आधारस्तंभ आहेत . माझ्या  लग्नाला  जवळ जवळ ६० वर्ष होत आलीत .परंतु भिला भाऊ ही  व्यक्ती कोण आहे मला माहीत नव्हते . परंतु जेव्हा महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था स्थापन करण्यात  आली तेव्हा पासून  ते आपल्या संपर्कात आले . त्यांच्या धर्मपत्नीला जाऊन १५ वर्षे झालीत . त्यांनी आपल्या मुली व मुलाकडे पाहून दुसरा विवाह  केला तर नाहीच परंतु तसा विचार मनात ही  नाही

 आणला  ही  बाब मंडळाला भूषणावह  नाही का ? आदर्श  संसार चे उत्तम उदाहरण म्हणजे भिलाभाऊ .

      भाऊंना दोन मुले व चार मुली आहेत.एक मुलगा इंजिनिअर असून दुसरा पारंपरिक शेती  पाहत आहे . आता तर नातवंडे व पतवंडे यांनी घर गोकुळ  आहे.
              त्याचे हे गुण हेरून च त्यांना संस्थेचे अध्यक्ष करण्यात आले.त्यांनी त्याचे सोने ही केले. संस्था fescom सारख्या राज्यस्तरीय संस्थेशी संलग्न करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.  शिवाय श्री शंकरराव खैरनार  सारख्या संचालकास नगर-नाशिकच्या प्रादेशिक कार्यकरिणीवर निवडून आणले. आइस्कॉन राष्ट्रीय संस्थेवर ७ सभासद patron म्हणून पाठविले.
           पाटणे गावात लोकशाही रुजविण्यात   सुभाष मंडळ या संस्थेचा  सिंहाचा वाटा होता. भिला भाऊ मंडळाचे कार्यशील सभासद होते आणि सुभाष मंडळ बँड पथक मध्ये बासुरी वादक म्हणून १९६०--१९७० दशकात ख्याती पावले होते.तत्कालीन काळात चौदवी का चाँद हो ,या गाण्यावर  त्यांना अनेक once more
मिळाले .एक समतोल वृत्तीचा ,सर्वाना बरोबर घेऊन जाणारा सद्गृहस्थ .बोले तैसा चाले बिरुद मिरवणारा .किती सांगू? किती बोलू ? 
             गागर मे सागर नही भरा जाता ,हेच खरे !
म्हणून तुम्हा सर्वांचे आभार .भाऊंचे उर्वरित आयुष्य सुखावह अंत येईपर्यंत आनंदाचे जावो .
       Thank You .